फकिरा
‘फकिरा’ या कादंबरीत वास्तव आणि आत्मकथानात्मक स्वरूप उलगडून दाखविताना खुद्द अण्णा भाऊ साठे म्हणतात – हा ‘फकिरा’ माझा होता. जे साकार नाही, त्याला आकार देण्याचं सामर्थ्य माझ्या ठायी नाही. जे पाहिलं अनुभवलं, ऐकलं, तेच मी लिहिलं आहे. यातून हा ‘फकिरा’ निर्माण झाला आहे. डोंगरात नि त्याच्या पायथ्याला विखुरलेलं फकिराचं कर्तृत्व एकत्र करून हा इमला उभारला, एवढचं – आणि त्याचंही एक कारण आहे. ते असं, की जेव्हा फकिराची भयंकर घोडदौड सुरू होती, तेव्हा मी पाळण्यात आराम करीत होतो. त्या रात्री भर मध्यानीला तो भरधाव धावत आला, तेव्हा त्यानं इंग्रजी खजिना लुटला होता. दारात येऊन त्याने आप्पाला हाक मारली. आप्पा गहरी नव्हता, म्हणून आत्या (आक्का) दारी आली आणि तीनंच त्याला माझ्या जन्माची वार्ता सांगितली. ती ऐकताच त्याने ओटीतून दोन ओंजळी सुरती रुपये आक्काच्या ओटीत ओतले आणि ”बाळ- बाळंतिणीची काळजी घ्या.” असे म्हणून तो घोड्याला टाच मारून निघून गेला. त्या वेळी त्याच्या घोड्याच्या टापा आक्कानं ऐकल्या, तो आत्मसमर्पणाची वाट कसा चालला, हे ही मला फार उशिरा समजलं. हेतू एवढाच की, जो उपेक्षित होता, अंधारात होता, तो प्रकाशात यावा, त्यानं महाराष्ट्र शारदेच्या मंदिरापुढं चिरंतन उभं राहावं, उपेक्षितांचा उत्कर्ष व्हावा. परंतु ‘फकिरा’ जरी उपेक्षित होता, तरी तो मला परका नव्हता. तो माझा होता. त्याच्या कर्तृत्वाचा पसारा आवरून मी ही कादंबरी लिहिली आहे. ती कशी आहे, हे महाराष्ट्रानं पाहावं. कारण, बा महाराष्ट्रा, तू थोर आहेस, विद्वान आहेस, करता-करविता आहेस; आणि मी काहीच नाही.
Specifications
- book-authors
- अण्णा भाऊ साठे
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.