मी वनवासी

मी वनवासी

120.00 INR In stock Buy at Merchant

आता प्रहररात्र उलटली होती. मरायची तयारी झाली होती. बस्स थोडा अवधी होता. गाव शांत झोपला होता. अधून-मधून टिटवी तेवढी टिर्र- टिर्र करून शांततेचा भांग करीत होती. जणू तीही मला सुचवित होती. घाई कर, घाई कर, लवकर मर, खरंच लवकर मर. आता नजर पैलतीरावर लागली होती. डोंगराचा प्रचंड कडा माझी वाट पाहात होता. संपूर्ण मोह आवरून मी ही निघालेच होते. जाता जाता मुलीच्या कोवळ्या गालावरती मी माझे ओठ टेकले. मात्र नकळत डोळ्यातील कढत पाणी तिच्या गालावर पडले… अन माझ्या बाळीने ‘दिलख़ुलास’ हंबरडा फोडला. कुण्या अबलेचे प्रेत निपचित होते । बिलगून तिला चिमुकले पीत होते ।। असं दृश्य डोळ्यांपुढं आलं आणि मी मरण कॅन्सल केलं. आता आभाळ गहिवरलं होतं. अंधार निवळला होता. पूर्वेला तांबडं फुटलं होतं. घनगंभीर वारा वाहत होता. बाकीचे सर्व तारे मलूल झाले असेल तरी एक तारा प्रखर तेजाने तळपत होता. त्याच वेळी मी माझ्या बाबड़ीचं नाव ठेवलं ममता…

Specifications
book-authors
सिंधुताई सपकाळ

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

67%