वारणेच्या खोऱ्यात
१९४२ साली लिहिलेली ही अण्णा भाऊ साठे यांची पहिली कादंबरी. या कादंबरीत ‘आरंभीचे शब्द’ यात ते लिहितात, ”जसे लहान बाळ दोन अडीच वर्ष उभे राहण्याचा प्रयत्न करते, त्या कालावधीत ते आदळते, आपटते, लोळते आणि शेवटी उठून उभे राहते, मग हळूहळू पावले उचलत चालू लागते, तद्वतच माझी ही पहिली कादंबरी दोन वर्षांच्या आदळआपटीनंतर लोळून घोळून शेवटी एकदाची उभी राहून हळूहळू पावले टाकीत मराठीच्या अंगणात खेळण्याकरिता येत आहे. त्याचबरोबर या कादंबरीची जननी माझी प्रतिभा साकार होऊन ती ही मराठी वाचकांपुढे येत आहे. म्हणून मलासुद्धा आईचाच आनंद होत आहे.” भारतीय स्वातंत्र्य चळवळीत काम करताना स्वातंत्र्यवीरांना कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागत असे, याचे मर्मग्राही चित्रण करणारी ही कादंबरी आहे.
Specifications
- book-authors
- अण्णा भाऊ साठे
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.