चौरस आहाराचे शास्त्रीय महत्त्व
‘ हे तो बोलणे प्रचीतीचे’ आधुनिक वैद्यकशास्त्राचा जनक हिपॉक्रेटीसने म्हटले आहे की, ‘Let thy food be thy medicine and let thy medicine be thy food.’ (तुमचे अन्न हे तुमचे औषध असू द्या. आणि तुमचे औषधही अन्नाप्रमाणे असू द्या.) आपल्या तत्त्वज्ञांनी फार पूर्वीच सुज्ञपणे म्हटलेले आहे की, जीवन करी जीवित्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म । उदरभरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म ।। अन्न हे फार प्रभावशाली अस्त्र निसर्गाने आपल्या हाती दिलेले आहे. आपल्या शरीराचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी या ‘पूर्णब्रह्माचा’ उपयोग होतो. त्याप्रमाणे शरीरावर आक्रमण करणाऱ्या जीवजंतूंचा संहारही याच्या सहाय्याने करने शक्य होते. आजच्या स्पर्धेच्या, ताणतणावांच्या व प्रदूषणाच्या जगात आत्मविश्वासाने, ताठ मानने, उत्साहाने ‘आगेकूच’ करायची असेल तर समतोल आहारात सांगितलेल्या चाळीस अन्नघटकांचा शरीराला पुरवठा करायला नको का ? योग्य अन्न, योग्य प्रमाणात, योग्य वेळी खाण्याची सवय नको का लावून घ्यायला ? ”आपलं आरोग्य आपल्याच हाती” असा निश्चय करून आहारशास्त्राची शास्त्रशुद्ध माहिती स्वत:च्या फायद्यासाठी नको का मिळवायला ? ही सारी माहिती अगदी सोप्या भाषेत आणि सुलभ पद्धतीने या पुस्तकात दिलेली आहे. शारीरिक, मानसिक व बौद्धिक आरोग्य संपादन करण्याची सोपी गुरुकिल्ली या आहार मार्गदर्शिकेत तुम्हाला सापडेल. गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी गुणवत्तापूर्वक आहार आवश्यक आहे हेच या पुस्तकाचे सार आहे.
Specifications
- book-authors
- मालती कारवारकर
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.