हनुमंत जसे आहेत तसे का आहेत ? ( Hanumant Jase Ahet Tase Ka Ahet ? )

हनुमंत जसे आहेत तसे का आहेत ? ( Hanumant Jase Ahet Tase Ka Ahet ? )

Brand: Granthpremi
300.00 INR In stock Buy at Merchant

Description हनुमंतांना वायुपूत्र का बनविण्यात आले? वायुपुत्रापेक्षा त्यांना पवनपुत्र म्हणणे हे जास्त आध्यात्मिक फायदा मिळवण्यासाठी का सांगितले असावे ? त्यांना वानराचेच रुप का देण्यात आले असावे?, इतर पशूचे का नाही? त्यांच्यावर शेंदूराचे लेपन का केल्या जाते? त्यांना कोणता नैवेद्य, फुले, पानांचा हार अर्पण केल्या जातो व का? त्यांना विशिष्टप्रकारे बसलेलेच का दाखविण्यात आले आहे ? त्यांच्या हातात विशिष्ट शस्त्रच का देण्यात आले आहे ? त्यांच्या दास्यभक्तीचा त्यांना काय फायदा मिळाला? त्यांना सांगिततज्ज्ञ असे का दाखविण्यात आले असावे? त्यांना चिरंजीव ही पदवी का देण्यात आली असावी? त्यांना बालाजी का म्हणतात? तिरुपती बालाजी आणि त्यांच्यामध्ये काय फरक आहे? त्यांनी लिहिलेल्या रामनामाने समुद्रावर दगड कसे तरले असावे? सोने हे जळू शकत नाही, तरीही त्यांनी सोन्याची लंका कशी जाळली असावी? किंवा सोन्याची लंका जाळण्याचा गूढार्थ काय ? हनुमंताचे सूर्याला गिळणे खरे आहे काय ? हनुमंत हे त्रेतायुगात रामासोबत आले, पण द्वापरयुगात अर्जुनासोबत सुध्दा महाभारत युध्दात ते का हजर राहू शकले ? समर्थ रामदासांनी मारुतींची अकराच मंदिरे का बांधली?, कमी किंवा जास्त का नाही? या आणि यासारख्या हनुमंताबद्दल असलेल्या अनेक जिज्ञासा शमविण्यासाठी, हनुमंताबद्दल असलेल्या प्रचलित अंधश्रद्धा दूर करून, करीत असलेली पूजा अधिक फलदायी होण्यासाठी, सूज्ञ वाचकांनी हा प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिलेला धर्म, तर्क, व्युत्पत्ती आणि मानसशास्त्रावर आधारित ग्रंथ जरूर वाचावा. Additional Information Publications : प्रसाद प्रकाशन (Prasad Prakashan) Author : चंद्रशेखर पंडित ( Chandrashekhar Pandit ) Binding : Paperback ISBN No : Language : मराठी ( Marathi ) Weight (gm) : 360gms Width : 22 Height : 14 Length : 3 Edition : 1 Pages : 290

Variants (1)
  • Default Title — 300.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

80%