Koham ( कोहम )
प्रा. उज्वला चक्रदेव कुलगुरू (श्रीम. ना दा. ठाकरसी महिला विद्यापीठ) डॉ. उज्वला चक्रदेव या वास्तुविशारद व शहरी नियोजनकार असून त्या श्री.ना.दा.ठा. महिला विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू २०२१ ते २०२६ होत्या. त्यांनी १९८४ मध्ये नागपूर येथील विश्वेश्वरय्या प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून (VRCE) वास्तुशास्त्राची पदवी प्राप्त केली. पुढे व्ही. एन.आय.टी. नागपूर येथून एम. टेक. (१९८९) व पीएच.डी.(२००६)पूर्ण केली. १९८५ पासून त्या अध्यापन क्षेत्रात कार्यरत असून वास्तुशिक्षणाच्या पद्धती आणि डिझाईन प्रक्रियेच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ‘Impact of Social Change on Architecture Education in India’ हा त्यांचा पीएच. डी. संशोधनाचा विषय होता. ‘Indian Knowledge Systems Innovative Research Perspectives from Emerging Scholars’ या पुस्तकाच्या मुख्य संपादिका आहेत. त्यांच्या लेखन व संपादनात ‘स्केल आणि टी- स्केल’, ‘Temples of Bharat: A Journey Through Time, Art, Architecture & Culture’, ‘वैदिक ऋषिकाएं’, ‘भारतीय मन्दिर-समय, वास्तुकला एवं संस्कृति के मूर्तिमान स्तम्भ’ यांसारखी पुस्तके समाविष्ट आहेत. तसेच Elsevier च्या Encyclopedia of Renewable and Sustainable Materials मध्ये त्यांनी सहलेखन केले असून ‘महाराष्ट्रातील वास्तुकला (परंपरा आणि वाटचाल)’ या पुस्तकातही त्यांचे लिखाण आहे. AICTE, COA, UGC, IGNOU व NBA सारख्या राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या विविध समित्यांवर त्यांनी कार्य केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी समितीच्या त्या अध्यक्ष होत्या. त्यांना भारतीय संस्कृती संरक्षण सन्मान (२०२४) आणि स्त्री शक्ती सन्मान (२०२४) यांसारखे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्सच्या Fellow असून INTACH च्या आजीवन सदस्य आहेत. भारत सरकारने २०२४ मध्ये त्यांना मानद कर्नल हा सम्मान दिला. प्राचीन मंदिर वास्तु, भारतीय ज्ञानपरंपरा व शाश्वत डिझाईन ही त्यांची विशेष संशोधनाची क्षेत्रे आहेत. मार्ग आणि साधने अनेक असली तरी कार्याची दिशा व उद्देश केवळ समाजसमृद्धी असावा, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.
Specifications
- Language
- Marathi
- Edition
- 1st
- Binding
- Paperback
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.