Panchavanna Pavsale by Jitendra Bhopale पंचावन्न पावसाळे… ध्यासाचे,संघर्षाचे, उत्कर्षाचे… जितेंद्र भोपळे
शासनसेवेतील आरंभिक पदावरून सुरुवात करून विभागाच्या सर्वोच्च पदावर नेतृत्त्व करताना कौटुंबिक, शासकीय आणि सार्वजनिक जीवनात वाट्याला आलेल्या सुख-दुःखाच्या कोसळत्या धारांचा प्रवास म्हणजे पंचावन्न पावसाळे ! हे पावसाळे लेखकाच्या स्मृतीचे पदर उलगडत शब्दाशब्दांतून वाचकाला विविधांगी अनुभवाने ओलेचिंब करतात. शासकीय अधिकाऱ्यांच्या जीवनातदेखील संघर्ष, सुख, दुःख, पराभव, स्पर्धा, प्रतिक्षा, सहकार, प्रेम, द्वेष अशा भावनांच्या थरारातील नाट्यमयता असू शकते, हे वास्तव आत्मकथनाच्या केंद्रस्थानी आहे. पाऊस या अबोल रुपकाच्या जड मौनालादेखील अर्थवाही संवादाचे धुमारे फुटू शकतात हे यातील निवेदनशैलीचं यश आहे. सर्वसामान्य अभियंता ते नगर रचना विभागाच्या संचालक पदावरील उच्चपदस्थ अधिकारी यादरम्यानच्या प्रवासातील वर्धिष्णु होत जाणारा आत्मशोध आणि आत्मविकासाचा आलेख अनुभवयाचा असेल तर हे पुस्तक निश्चितच वाचलं पाहिजे. एका ध्यासाचा, संघर्षाचा आणि उत्कर्षाचा प्रेरणादायी प्रवास… पंचावन्न पावसाळे !
Specifications
- Publication
- Rohan Prakashan
- Author
- Jitendra Bhopale
Variants (1)
- Rohan Prakashan / Jitendra Bhopale — 360.00 INR — In stock
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.