Missing product image

Jyeshthansathi Mayechi Sawali ज्येष्ठांसाठी मायेची सावली by Azhar Nadaf

Brand: Rasik Sahitya
160.00 INR In stock Buy at Merchant

आज भारतात असे लाखो ज्येष्ठ आहेत ज्यांना कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जगावं लागतं आहे. अनेकदा मुलं त्यांच्या उपजीविकेमुळे गाव, शहर सोडून दुसरीकडे राहतात आणि मग अशा वेळी ज्येष्ठ पालक एकटे पडतात. जेव्हा आपल्या मुला-बाळांसोबत असण्याची सर्वच दृष्टीने गरज असते, तेव्हाच ते एकाकी होतात. शहरी भागांत अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी काही सोयी-सुविधा असतातही पण ग्रामीण भागात अशा मूलभूत सोयी-सुविधांची वानवाच असते. अशा पार्श्वभूमीवर ‘जनसेवा ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान’ने चंद्रपूर जिल्ह्यात ७५ गावांत ज्येष्ठांना उपचार, विरंगुळा आणि सोबत अशा सुविधांसंदर्भात एक पथदर्शी प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पातील कार्यकर्त्यांच्या अनुभवांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. आयुष्य जगून उतरणीला लागलेल्या माणसांच्या कथा-व्यथा आणि या प्रकल्पाने सावली दिल्यानंतर त्यांनी अनुभवलेले आनंदाचे क्षण यांचं शब्दरुप म्हणजेच ज्येष्ठांसाठी मायेची सावली !

Variants (1)
  • Default Title — 160.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

70%