माझा रशियाचा प्रवास
अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या ‘माझा रशियाचा प्रवास’ यातून प्रवास वर्णनाची वाङ्मयीन वैशिष्ट्ये पुरेपूर दिसतात. अण्णाभाऊंचे हे प्रवासवर्णन सर्वच निकषांवर पुरेपूर उतरले आहे. जिज्ञासा, औत्सुक्य, बुद्धी, वैभव, अभ्यासू माहिती, स्मरणशक्ती, वर्णनशैली, विनोदबुद्धी, घटना, निवेदन, प्रसंगसंगती, या बाबींनी अण्णाभाऊंचे हे प्रवासवर्णन सर्व बाजूंनी सरस आहे. अण्णाभाऊंनी आपल्या जीवन हेतूंचाही यात कठोर आत्मशोध घेतला आहे. या अर्थाने हे प्रवासवर्णन भूक आणि भीक यांचा शोध घेणारे आहे. यथातथ्य वर्णन, भरगच्च तपशील, मानवी मनाचा शोधा घेण्याचा प्रयत्न, लेखकाच्या मिस्कील व्यक्तिमत्त्वाचे घडणारे दर्शन या वैशिष्टयांबरोबरच समाजवादी राशियाच्या जीवन पद्धतीची अण्णाभाऊंसारख्या प्रतिभाशाली कलावंताने खोलवर जाऊन घेतलेली तरल, भावनिक उलट तपासणी हे या प्रवासवर्णानाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
Specifications
- book-authors
- अण्णा भाऊ साठे
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.