Missing product image

स्त्री-मुक्तीचे आकाश

135.00 INR In stock Buy at Merchant

पशु, पक्षी, कीटक किंवा कोणत्याही सजीवांमध्ये नर-मादी असते. नर – मादी यांच्या मिलनातून नवीन जीवाची उत्पत्ती होत असते. तद्वतच मानवी समाजात पुरुष आणि स्त्री आहेत. त्यांच्या मिलनातूनच समाजाचे सातत्य टिकून राहिले आहे. त्यामुळे पुरुष श्रेष्ठ की महिला श्रेष्ठ प्रश्नच निर्माण होत नाही. समाजजीवनात स्त्री आणि पुरुष हे दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत. मानवी समाजातून स्त्री वजा करणे किंवा पुरुष वजा करणे शक्य नाही. समाजाचे सातत्य टिकवून ठेवण्याकरिता दोघेही महत्त्वाचे आहे. असे असताना स्त्री पेक्षा पुरुषाला का विशेष महत्व दिले आहे ? असा प्रश्न निर्माण केला जातो. पृथ्वीतलावर सर्वत्रच स्त्रीला गौण स्थान होते. विशेषत: भारतीय समाजात स्त्रीवर अनेक धार्मिक बंधने लादण्यात आले होते. मनुस्मृतीमध्ये तर ‘न स्त्री स्वातंत्र्य महर्ती ‘ असा शिक्कामोर्तब करून स्त्रीचे स्वातंत्र्यच नाकारण्यात आले होते. हिंदू धर्मात तर स्त्रीला ‘लक्ष्मी’, ‘देवता’ इत्यादी नावांनी संबोधून तिचा शाब्दिक खूप गौरव करण्यात आला. परंतु ‘स्त्री’ एक स्वतंत्र व्यक्ति म्हणून तिचा कधीच विचार करण्यात आला नाही. ‘स्त्री’ ला देखील शुद्रांप्रमाणेच तुच्छ मानून मूलभूत अधिकारांपासून टीला वंचित ठेवण्यात आले होते. धर्माच्या नावावर असंख्य व्रतवैकल्यांच्या बंधनात टीला अडकवून ठेवले होते. तिच्या प्रगतीचे सर्व मार्गच बंद करण्यात आले होते. आम्ही मनुस्मृती का जाळतो ? भारतीय स्त्री खरच स्वतंत्र आहे का ? धर्मात अडकलेली मी पहिली स्त्रीवादी लेखिका : ताराबाई शिंदे धर्माची बंधनात्मक कायदे महिलांनाच का ? वटसावित्री की जोती-सावित्री मासिक पाळी आणि स्त्रीत्व भारतासारख्या देशात हे कितपत यशस्वी होईल ? आंबेडकरवादी भारतीय स्त्री व अन्य भारतीय स्त्री महात्मा फुले व डॉ. बाबासाहेबांना अपेक्षित स्त्री मूलभूत अधिकार हवेत पण कर्तव्यांचे काय ? रक्तातील भीम शोधण्याऐवजी विचारातील भीम शोधणे महत्त्वाचे ! मुक्ताशी मुक्तसंवाद हिंदू कोड बिल आणि भारतीय महिला जळतोय मणिपुर – धगधगतात भारतीय स्त्रियांची मने

Specifications
book-authors
माधुरी गायधनी दुपटे

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

64%