दलित फाईल्स | Dalit Files By Sharankumar Limbale

दलित फाईल्स | Dalit Files By Sharankumar Limbale

Brand: Dilipraj Prakashan
350.00 INR In stock Buy at Merchant

*प्रकाशनपूर्व नोंदणी. पुस्तक ३ ऑक्टोबर नंतर पाठवले जाईल. 'दलित फाईल्स' ही शरणकुमार लिंबाळे यांची नववी कादंबरी आहे. 'सेक्स आणि जात' या विषयाला ही कादंबरी धीटपणे भिडताना दिसते. हिंसा, जघन्य अपराध, अमानुष अत्याचार, जीवघेणी अंधश्रद्धा, प्रतिकूल परिस्थिती, जगण्यातला चिवट संघर्ष आणि भयानक जातीय तेढ यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. 'दलित जाणीव आणि दलित अनुभव' ही तर लिंबाळ्यांच्या लेखनाची शक्ती आहे. समाज, चळवळ आणि कार्यकर्ता ही त्यांच्या लेखनाची ऊर्जा आहे. ओघवती भाषा, काव्यात्मक शैली, वेधक वर्णन आणि वैचारिक वाद-विवाद यामुळे ही कादंबरी वाचनीय झाली आहे. 'दलित फाईल्स' ही कादंबरी वाचताना मनावर ताण येतो; अपेक्षाभंग होतो आणि मन अंतर्मुख होते. ही कादंबरी विलक्षण अनुभवांचा प्रत्यय देणारी झाली आहे. - लक्ष्मण गायकवाड 'उचल्या'कार

Variants (1)
  • Default Title — 350.00 INR — In stock

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

72%