शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया

शुद्ध बुद्ध काया तुकोबाराया

225.00 INR In stock Buy at Merchant

कलावंतांनी शक्यतो भूमिका घ्यायचीच नाही, चुकून घेतलीच तर ‘हाही छान, तोही छान’ असा आशाळभूत बोटचेपेपणाच करायचा, असा लाचार काळ बोकाळला आहे. त्यात सुस्पष्ट आणि खणखणीत भूमिका घेऊन प्रसंगी सत्तेच्या विरोधात बेडरपणे उभा ठाकणारा, त्यासाठी पडेल ती किंमत मोजणारा, मेंदू गहाण ट्रोल्सच्या झुंडी अंगावर घेवून साता समुद्रापार भिरकावून देणारा मराठीतला खराखुरा ”अँग्री यंग मैन” म्हणजे किरण माने… नुसताचा अभिनेता नाही, तर चौफेर टोलंदाजी करणारा फर्डा वक्ता आणि फेसबुकवरच्या एकेका पोस्टमधून लोकांना एकीकडे शब्दांच्या तालावर डोलवत दुसरीकडे त्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारा एक प्रखर सामाजिक भान बाळगणारा लेखक. आपल्या धडावर आपलंच डोकं बाळगणाऱ्या किरण मानेंची वैचारिक नाळ जुळली आहे. ती आपल्या काळातील ”अँग्री यंग मैन” असलेल्या दांभिक व्यवस्थेवर शब्दांचे आसूड़ ओढणाऱ्या तुकोबारायांशी. म्हणूनच तुकोबांच्या एरवी सर्वपरिचित असलेल्या अभंगांचीही ओळख माने वेगळ्याच प्रकारे करून देतात. टाळकुटे, परमार्थी संत अशी सगळ्याच वारकरी संतांची मतलबी मांडणी करणाऱ्या पोटार्थी परंपरेला धुडकावून, या अभंगांवर झळझळीत प्रकाश टाकतात. ही तुकोबांची ‘शुद्ध बुद्ध काया” रूप महाप्रतिमा उभी करणारी मांडणी तुकोबांच्या विद्रोही परंपरेचाच वारसा अभिमानाने पुढे चालवते आणि वाचकांना तुकोबाराया नव्याने भेटवते…

Specifications
book-authors
किरण माने

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

72%