Me diva vijavla nahi (मी दिवा विझवला नाही)

Me diva vijavla nahi (मी दिवा विझवला नाही)

250.00 INR In stock Buy at Merchant

गझलचा दिवा लावणारा गझलकार … श्वास गझल निःश्वास गझल जगण्याचा विश्वास गझल द्वेषाची दुनिया बदले माणुसकीचा ध्यास गझल ‘जीवा’ ने गझलची वर्णिलेली ही महती म्हणजे गझलवर जीव टाकणाऱ्या आम्हा प्रत्येकाचे मनोगतच. गझलचा ध्यास घेतलेला असाच एक गझलकार म्हणजे गिरीश जोशी. मराठी गझलच्या प्रचार-प्रसार उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या ‘गझल संवाद’च्या आयोजनप्रसंगी गिरीशचा परिचय झाला आणि त्याच्या गझलध्यासाची प्रचिती आली. उत्तम गझलकार आणि उत्तम शिक्षक असलेला, निर्मळ मनाचा गिरीश एक उत्तम कलावंतही आहे याचा मला विशेष आनंद वाटतो. सोसलेल्या वंचनांचे सार गझला सोबती आहेत माझ्या चार गझला कोणत्या मापात मोजावे कळेना भावनांचा सागरी विस्तार गझला व्वा ! क्या कहने है गिरीश !! गिरीशची गझल स्वरबद्ध करून मी रसिकांसमोर पेश करतोय आणि तबला साथीला साक्षात गिरीश … हे स्वप्न मी पाहतो आहे, ते पूर्ण होवो … आमीन ! गिरीशच्या गझल संग्रहाला रसिकांची भरभरून दाद मिळेल याबद्दल मी आश्वस्त आहे … माझ्या मनभरून शुभेच्छा ! स्नेहांकित, गझलनवाज भीमराव पांचाळे

Specifications
Language
Marathi
Publishing Year
2026
Writer
Girish Joshi

How AI sees this product

The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.

76%