ताबा मर्कट मनाचा, अनुभव आपल्या उत्कृष्टतेचा
ताबा मर्कट मनाचा : अनुभव आपल्या उत्कृष्टतेचा हे पुस्तक तुम्हाला मनाच्या अधिकाधिक अंतरंगापर्यंत अलगदपणे घेऊन जाते व मन कसे फसवते याची जाणीव करून देते. मूळ सत्य व वास्तवता काय आहे याची माहिती हे पुस्तक देतेच, पण त्यासोबत त्या माहितीचा उपयोग प्रत्येकाने त्याच्या व्यावसायिक आणि खाजगी आयुष्यात कसा करावा याचे मार्गदर्शन सुलभरित्या मांडते. रंजक संवाद व तहत विषयाला हाट घालणे या लेखन शैलीमुळे तुम्हाला “अंतिम वास्तवाची” जाणीव सहजपणे मिळण्यास मदत होते. शब्दांची चपखल निवड आणि सुटसुटीत वाक्यरचना यामुळे एक तजेला देणारा आनंद संपूर्ण पुस्तक वाचण्याच्या आघात प्राप्त होतो. तुम्हाला स्वत:चे अनुभव या पुस्तकातील खुसखुशीत व सुंदरपणे मांडलेल्या उदाहरणांनी जोडणे सहज शक्य होईल. हे पुस्तक चांगल्या गोष्टींची कदर करणारे तसेच सामर्थ्य देणारे असे आहे, पण त्याचसोबत असत्य, अवास्तव, मानसिक दुर्बलता व आळशीपणा आणि जबाबदारी न घेणे अशा बाबींवर परखडपणे टीका करते. या पुस्तकाचे वाचन आयुष्याला कलाटणी देणारा अनुभव ठरू शकतो, ज्यामुळे अनुभूतीची जाणीव आणि प्रत्यक्षात वापरलेल्या तत्त्वांमुळे मिळणारी फलप्राप्ती यांचा संबंध जुळून येईल.
Specifications
- book-authors
- आनंद पाटकर
AI Readiness
Good foundation, but some important product data is still missing.