Missing product image

गोष्टी रमाईच्या

65.00 INR In stock Buy at Merchant

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत विपुल लेखन झाले अनेक प्रकारे अनेक भाषांतून लिहिले गेले. त्यांच्या पांडित्याबाबत, त्यांच्या क्रांतीबाबत, त्यांच्या जीवनातील एकेका घटनेवर एकेक ग्रंथ झाला. अनेक नाटकं झाली. अनेक काव्य झाली, आणि होत राहातील. त्याच प्रकांडपंडिताची, हिमालयाची सावली झालेली रमाई ! रमाई, ही नुसती अर्धागिनीच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या यशाची वाटेकरी आहे. सारी दु:ख, साऱ्या यातना स्वत: भोगल्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना संसाराच्या पाशातून मुक्त केले स्वत: जीवनभर अदृश्य अशा आगीत जळत राहीली, होरपळत राहिली. पण त्याची झळ दुसऱ्या कोणासही पोहचू नाही दिली. दस्तुर खुद्द बाबासाहेबांनाही तिने त्याची झळ पोहचू दिली नाही. कोणताही हव्यास नाही. कोणतीही अपेक्षा नाही म्हणून रमाईला नुसती त्यागाची आणि सहनशिलतेची मूर्ती बोलून कसे चालेल ? म्हणूनच या विरुदावलीतून बाहेर काढण्याचा प्रयत्ने मी माझ्या महामाता रमाई या पुस्तकाने केला आहे. त्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीनंतर अनेकांनी माता रमाई ही गोष्ट रूपात लिहिण्याचे सुचविले, काहींनी आग्रह केला म्हणून गोष्टी रमाईच्या हे पुस्तक मी वाचकांसमोर ठेवीत आहे.

Specifications
book-authors
नथुराम जाधव

AI Readiness

Good foundation, but some important product data is still missing.

64%