Tanjavar Maratha Samrajyateel Rajanche Yogdan | तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान
"तंजावरच्या मराठा राजांच्या या बहुआयामी कार्याचा परिचय व्यापक समाजाला करून देण्यासाठी प्रतापसिंह सरफोजी राजे भोसले यांनी इंग्रजीत लिहिलेला ‘काँट्रिब्युशन्स ऑफ तंजावूर मराठा किंग्ज’ या ग्रंथाचे प्रा. डॉ. मनोहर इंगळे यांच्या अभ्यासपूर्ण आणि अनुभवसिद्ध लेखणीतून साकारलेले ‘तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान’ हे मराठी रूपांतरण महाराष्ट्रातील वाचकांना दक्षिणेतील मराठी साम्राज्याचा वैभवशाली इतिहास नव्याने उलगडून दाखवेल आणि इतिहास संशोधक, विद्यार्थी आणि संस्कृति अभ्यासक यांना निश्चितच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरेल असा दृढ विश्वास वाटतो. (- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देेवेंद्रजी फडणवीस यांनी पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेतून) तंजावरचा सांस्कृतिक, पराक्रमी इतिहास निश्चितच प्रेरणादायी आहे. तथापि हा इतिहास फक्त तंजावर, तमिळनाडू किंवा संपूर्ण भारतापुरताच मर्यादित न राहता तो जागतिक पातळीवर सुपरिचित होण्यास तंजावर मराठा साम्राज्यातील राजांचे योगदान या पुस्तकाचे मोठे योगदान राहील याची आम्हास खात्री आहे. युवराज प्रतापसिंह यांनी तंजावर राजघराण्याचा आणि तंजावर साम्राज्याचा वस्तूनिष्ठ इतिहास जगासमोर अभ्यासू दृष्टीकोनातून आणला ही एक कौतुकास्पद आणि अभिमानाची बाब आहे. - छत्रपति मा. श्री. उदयन राजे भोसले A book on contributions of Maratha Kings of Tanjore by Yuvraj Pratapsinh Sarfoji Raje Bhosale "
Variants (1)
- Default Title — 250.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.