TinTera (तीनतेरा)
शिक्षण व्यवस्थेत सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या सेवाभावी वर्गानंतर, शिक्षण संस्था म्हणजे राजकारण्यांच्या व्यापारी पेठा झाल्याचे चित्र आपणास पाहावयास मिळते. त्यातून जन्मलेल्या मूल्यविहीनतेत, भ्रष्टाचारात, सामाजिक मूल्यपोषणाऐवजी झालेल्या नैतिक ्हासात आजच्या शिक्षणव्यवस्थेचे भ्रमनिराश करणारे वास्तव लपले आहे. ही गोष्ट या कादंबरीमागच्या प्रयोजनाचे मुख्य सूत्र सांगता येते. कारण, समकालीन शिक्षणव्यवस्थेच्या अवमूल्यनाची ही एक दुखरी नस आहे. नुसत्या ह्याच बाजूंचा विचार करून समकालीन शिक्षणव्यवस्थेची गिचमिळ पूर्ण होत नाही. त्यात जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर उदयास आलेल्या नव्या समाजकारण्यांचा कॉर्पोरेटवर्ग या कादंबरीचे कथीत सूचनही आहे. पुन्हा एका चालत आलेल्या ज्ञानदानव्यवस्थेचे शोषण, आणि त्यांच्या व्यापारीकरणात माणसांचे झालेले वस्तुकरण स्वाभिमानशून्यतेत बदलायला लावणारे आहे. ही गोष्ट भयंकर निराशादायक आहे. येथे ज्ञानदानाचे कार्य एक Product म्हणून आणि संस्थात्मक आवास कारखानदारी म्हणून आपल्या पदरात ठेवल्याचे चित्र गंभीर स्वरूपाचे आहे. त्याचा प्रत्यय या कादंबरीच्या अवकाशातून पुढे येतो. या संस्थाना जोडलेले सामाजिक वास्तव या कॉर्पोरेट जगताचे (users) ग्राहक म्हणून ओळखल्या जातात. त्यामुळे या खुल्या अर्थव्यवस्थेत मागणी तसा पुरवठा वानगी तशा हातमिळवणीचे हे युग आहे. या तिहेरी पेचात सापडलेले अनेक कृष्णा या वास्तवात आपल्या भवितव्याच्या अंधारात चाचपडत आहेत. कारण ‘तीनतेरा’ मधील नायक मध्यमवर्गीय घडणीचा, भीतीग्रस्त आणि व्यवस्थाशरण आहे. परिस्थितीने त्याला तसे घडवले असले तरी, जिवंत असलेला आशावाद एका प्रतिनायकाचा आहे. त्यानुषंगाने तो व्यवस्थेची चिरफाडही करतो आहे. त्यादृष्टीने या युगाचा कोसळ आणि जोडीने आलेली भडास त्याचे विद्रोही सूचन या कादंबरीतून, त्याच्या अर्थवाही तपशीलातून होते आहे. ही सूचकताच बंडखोरीची व नव्या बदलासाठीच्या प्रेरणेची नांदी असेल. त्याचे स्रोत आजच्या समकालीन वास्तवात, सभोवतालच्या परिस्थितीत आपण अनुभवत आहोत. त्यात रोहित देशमुखांची पहिलीच कादंबरी असून त्यातून मिळालेला अवकाश आजची मोठी उपलब्धी असेल. ही गोष्ट विचारात घेतली पाहिजे. या कादंबरीची भाषाशैली ओघवती असून, छोट्या छोट्या तपशीलातून आपल्या समकालीन जीवनजाणिवांकडे निर्देश करायला लावणारी आहे. -दा. गो. काळे
Specifications
- Writer
- Rohit Deshmukh
- Language
- Marathi
- Publishing Year
- 2026
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.