कथासरिता - संपादित कथासंग्रह | Kathasarita | TYBA | Savitribai Phule Pune University
‘कथा’ हा जगातील सर्व भाषिकसमूहांमध्ये प्राचीन काळापासून आढळणारा वाङ्मयप्रकार आहे. प्रामुख्याने मनोरंजनासाठी निर्माण झालेली कथा कधी भुताखेतांच्या अद्भुतविश्वात रमली, तर कधी पशुपक्ष्यांच्या जगात वावरली. राजा-राणीच्या गोष्टी सांगतानाच ती देवादिकांच्याही गोष्टी सांगू लागली. देवी-देवतांचे महत्त्वमंडन करताना तिने व्रतकथेचे रूप धारण केले; तर मानवी मनातील सुष्टदृष्ट वृत्ती-प्रवृत्ती रेखाटताना लोककथेतील नानाविध आविष्कार घडविले. मानवी जीवन वैविध्यपूर्ण आहे. त्यात नैसर्गिक अशा – ज्यांना वैश्विक संबोधता येतील अशा- भावभावनांचा, विकारांचा, जैविक प्रेरणांचा व त्यांच्या शमन-दमनामधून निर्माण होणाऱ्या समस्यांचा जसा भाग आहे: तसाच मानवनिर्मित व्यवस्थेमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचाही भाग आहे. आजच्या आधुनिक मराठी कथेने या दोन्ही भागांना आपल्यात सामावून घेतलेले आहे. त्यामुळेच ती आज मानवीजीवनाचे विविधांगी आकलन वाचकांसमोर मांडते आहे. ‘कथासरिता’ या कथासंग्रहात अशाच विविधांगी मानवीजीवनदर्शन घडविणाऱ्या कथांची गुंफण केलेली आहे. एकाच एका विषयसूत्राची वा आशयसूत्राची बांधिलकी न स्वीकारता या कथा निवडल्या असल्याने वाचकांना आशयाभिव्यक्तीचे विविध आयाम या कथासंग्रहातून अनुभवायला मिळणार आहेत. मराठी साहित्यातील कथांची सरिता आजही अखंडपणे प्रवाही आहे. संपादकांनी तिच्यामध्ये पोहरे टाकून काही कथा निवडल्या आहेत. त्यांचा आस्वाद घेताना वाचक नक्कीच अधिकाधिक संपृक्त होत जातील असे वाटते. -प्रा.डॉ.सुधाकर शेलार सदस्य, मराठी अभ्यासमंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे. Kathasarita - A textbook for TYBA Marathi (TYBA MR 310 MJ)) Savitribai Phule Pune. University.
Variants (1)
- Default Title — 135.00 INR — In stock
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.