वैज्ञानिक करामती
खरं पाहता विज्ञान इतके पुढे गेले आहे की डोकं सुन्न होते. आपण डोळ्यादेखत बघत असताना कशातून काय होते हे कळतच नाही. प्रत्येक मनुष्य काहीतरी नवीन शोधण्याचा पाठीमागे लागला आहे. प्रत्येक क्षेत्रातील जादूगर वेगवेगळे असतात. नवीन नवीन शोधण्यात त्यांचा वेळ जात असतो. समोरच्या माणसापेक्षा आपण काहीतरी वेगळे करू या जिज्ञासेपोटी तो धडपडत असतो. तुम्ही सुद्धा तुमच्या मित्रांत-परिवारात आपले एक विशिष्ट स्थान बनवू पाहता. खरं ना ? याचसाठी तुमच्या समोर काही वैज्ञानिक प्रयोग या पुस्तकात देत आहे. अशा या प्रकारच्या प्रयोगामधून निरिक्षण शक्ती वाढते, चौकसबुद्धी वाढवी, कुतूहल वाढावे अशी अपेक्षा आहे. प्रयोगामध्ये दिलेली रसायने काळजीपूर्वक वापरावी. मुले जसजसे हे प्रयोग करतील तसतसे त्यांचे विज्ञानाचे आकर्षण वाढेल, हे मात्र नक्की. सायन्स-गणित मिळूनच जादू जन्माला आली. अर्थात हातसफाईचीही त्याला जोड लागते. सवयीने ती जमते आणि जमली की प्रेक्षकांत, परिवारात आणि मित्रांमध्ये तुमची कॉलर ताठ, खरं ना ?
Specifications
- book-authors
- अशोक प्रभु
How AI sees this product
The more complete this product's details, the more confidently AI assistants can understand and recommend it.